सर्वाधिक श्रीमंत कोणत्या देशात? नव्या यादीत भारताने दाखवली ताकद...

Rajanand More

श्रीमंतांची नवी यादी

नाइट फ्रॅंक या प्रॉपर्टी कन्सल्टिंग फर्मचा ग्लोबल वेल्थ रिपोर्ट 2025 प्रसिध्द झाला आहे. त्यामध्ये जगातील अब्जाधीशांची माहिती देण्यात आली आहे.

Richest countries list | Sarkarnama

सर्वाधिक कुठे?

रिपोर्टनुसार, सर्वाधिक श्रीमंत लोक अमेरिकेत आहेत. अमेरिका जगात पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानी चीनचा दबदबा आहे.

Richest countries list | Sarkarnama

भारत कुठे?

यादीत तिसऱ्या क्रमांकावर जपान असून भारतला चौथे स्थान देण्यात आले आहे. भारतातील श्रीमंतांची संख्या वेगाने वाढत असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Richest countries list | Sarkarnama

अब्जाधीश किती?

भारतात 2024 मध्ये अब्जाधीशांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली असून ती 191 पर्यंत पोहचली आहे. यापुढेही ती वेगाने वाढत जाईल, असा अंदाज आहे.

Gautam Adani | Sarkarnama

किती संपत्ती?

भारतातील 191 अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती सुमारे 950 अब्ज डॉलर एवढी असल्याचे अहवाल म्हटले आहे. तर अमेरिकेतील अब्जाधीशांकडे 5.7 ट्रिलियन डॉलर एवढा पैसा आहे.

Mukesh Ambani | Sarkarnama

कुणाचा समावेश?

नाइट फ्रॅंकच्या निकषानुसार भारतातील श्रीमंतांच्या यादीसाठी किमान 87 कोटी संपत्तीचा निकष निश्चित करण्यात आला आहे.

Richest countries list | Sarkarnama

कोट्याधीश किती?

हा निकष पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत भारतातील 85 हजार 698 जणांचा समावेश आहे. पुढील तीन वर्षांत हा आकडा 93 हजार 758 वर जाईल, असा अंदाज रिपोर्टमध्ये वर्तविण्यात आला आहे.

Richest countries list | Sarkarnama

कोणती क्षेत्र आघाडीवर?

भारतातील श्रीमंतांचा आकडा वाढण्यामागे वाढते उद्योगधंदे तसेच रिअल इस्टेट या प्रमुख क्षेत्रांचा हातभार आहे. वाढते स्टार्टअप्सही त्यास कारणीभूत ठरत आहेत.   

Richest countries list | Sarkarnama

NEXT : 'या' तरुणीचे शरद पवारांसमोर खणखणीत भाषण...

येथे क्लिक करा.