Rajanand More
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन मंगळवारी (ता. 10) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी एका तरूण मुस्लिम महिला पदाधिकाऱ्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
मर्झिया पठाण हे त्यांचे नाव. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी त्यांनी काही महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली आहे.
मर्झिया यांनी वर्धापनदिन सोहळ्यात भाषण करण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी दोनच मिनिटे केलेल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
तुम्ही केवळ महाराष्ट्रच नव्हे, देश नव्हे तर इंटरनॅशनल सुपरस्टार, हिरो आहात. तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामामुळे आज महिला पुढे येऊन काम करत आहेत, असे यावेळी बोलताना मर्झिया म्हणाल्या.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतच मी मोठी झाली आहे. त्यामुळेच इथे येऊ शकली, असे मर्झिया म्हणाल्या. जय भीम, जय संविधान म्हणत त्यांनी भाषण संपविले.
जल गया है मेरा घर और बच गया हूं मै, और जब बच गया हूं मै तो जला ही क्या है... या मर्झिया यांच्या ओळींनी संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला, अनेकांनी त्यांचे कौतुक केले.
मर्झिया या ठाणे जिल्ह्यातील मंब्रा भागातील कार्यकर्त्या आहेत. सामाजिक कार्यातून त्यांनी या भागात धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
मर्झिया यांचे वडील अश्रफ शानू पठाण हे ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मर्झिया यांनी राजकारणात थेट राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. दोघेही आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक आहेत.