सरकारनामा ब्यूरो
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भारताचे असे कोणते सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहेत जे देशातील उत्कष्ट खेळाडू, कलाकार आहेत यांना दिलं जात.
देशासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नागरिकांना केंद्र सरकारकडून या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.
भारतात प्रामुख्याने चार सर्वोच्च पुरस्कार दिले जातात.
1954 पासून हे सर्वोच्च पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात आली.
भारतात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे 'भारतरत्न' पुरस्कार.
हा पहिल्यांदा 1954ला सर्वेपल्लि राधाकृष्णन यांना देण्यात आला होता.
भारतरत्न पुरस्कारानंतर दिला जाणारा दुसरा पुरस्कार म्हणजे 'पद्मविभूषण'.
पद्मभूषण हा देशातील तिसऱ्या क्रमाकांचा सन्मान मानला जातो.
पद्मश्री हा पुरस्कार सर्व क्षेत्रातील नागरिकांसाठी असता हा चौथ्या क्रमांकाचा सन्मान असून जो कला ,खेळ, शिक्षण, उद्योग, सेवा या साठी दिला जातो.