Jagdish Patil
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि PM नरेंद्र मोदी यांची चांगली मैत्री असली तरी दोघांमध्ये सतत खटके उडत असतात.
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी नितीशकुमार यांच्या पाठिंब्याची गरज आहे.
लोकसभेचा निकाल लागल्यापासून नितीश कुमार कोणाला पाठिंबा देणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार हे कधी एकमेकांच्या जवळ येतात तर कधी त्यांच्यात मतभेद होतात.
मोदींच्या पाठिंब्यामुळे आपले मतदार नाराज होतील या भीतीने 2009 च्या लोकसभेला नितीश कुमार यांनी मोदींना बिहारमध्ये प्रचार करू दिला नाही.
मोदी आणि नितीश दोघांमधील मतभेद 2013 मध्ये समोर आले. सप्टेंबर 2013 मध्ये भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करताच नितीश भडकले होते.
जून 2013 मध्ये नितीश यांनी 'एनडीए'ला रामराम ठोकला. भाजप आणि जेडीयू 17 वर्षे एकत्र होते. जुलै 2017 मध्ये ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले. नंतर पुन्हा ते 2022 मध्ये लांब गेले होते.
आता 2024 मध्ये मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठीही NDA आघाडीतील घटकपक्षात असलेल्या नितीश कुमारांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.