Jagdish Patil
दिवाळीत ग्रीन फटाके फोडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. तर हे ग्रीन फटाके म्हणजे नेमकं काय आणि ते ओळखायचे कसे ते जाणून घेऊया.
दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रीन फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
ग्रीन फटाक्यांमुळे सामान्य फटाक्यांपेक्षा अंदाजे 30 % कमी प्रदूषण होते. त्यामुळे याच्या वापरास परवानगी दिली आहे.
न्यायालयाने हे फटाके फक्त सकाळी 6 ते 7 आणि रात्री 8 ते 10 या वेळेतच फोडण्याची परवानगी दिली आहे.
हे फटाके फक्त सीएसआयआर-एनईईआरआयद्वारे परवानाकृत कारखान्यांमध्ये तयार केले जातात.
ते कोणत्याही हानिकारक रसायनांशिवाय बनवले जातात. शिवाय ते सल्फर डायऑक्साइड (SO2) आणि नायट्रोजन ऑक्साईड (NOx) कमी प्रमाणात उत्सर्जित करतात.
सामान्य फटाके 160 डेसिबलचा आवाज निर्माण करतात, तर ग्रीन फटाक्यांचा आवाज 100-125 डेसिबलपर्यंत मर्यादित असतो.
ग्रीन फटाक्यांवर 'ग्रीन क्रॅकर' असं लेबल असतं. सर्वात महत्वाचं या फटाक्यांवर QR कोड असतो.
हा QR स्कॅन केल्यानंतर बॅच क्रमांक, उत्पादन तारीख, किंमत दिसेल. बनावट फटाक्यांवर ही माहिती शक्यतो नसते.