Nupur Sharma : जाणून घ्या, BJP माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे शिक्षण किती?

Rashmi Mane

नूपुर शर्मा

नूपुर शर्मा यांनी भाजपमध्ये अनेक पदे भूषवली आहेत. त्या भारतीय जनता युवा मोर्चाचा मुख्य चेहरा होत्या. यासोबतच ती युथ विंगच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आणि दिल्ली राज्य कार्यकारिणीच्या सदस्याही राहिल्या आहेत.

Nupur Sharma | Sarkarnama

शिक्षणाबद्दल

नूपुर शर्मा या सुशिक्षित नेत्यांमध्ये गणल्या जातात. त्यांनी परदेशातून शिक्षण घेतले आहे. जाणून घेऊया त्यांच्या शिक्षणाबद्दल.

Nupur Sharma | Sarkarnama

पदवीचे शिक्षण

नूपुर शर्माने त्यांचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोड येथून केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Nupur Sharma | Sarkarnama

कायद्याचे शिक्षण

यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातूनच कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर त्या लंडनला शिक्षणासाठी गेल्या.

Nupur Sharma | Sarkarnama

पदव्युत्तर पदवी

नूपुर शर्माने 2011 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स कॉलेजमधून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली.

Nupur Sharma | Sarkarnama

राजकारणात सक्रिय

नूपुर शर्मा कॉलेजच्या दिवसांपासून राजकारणात सक्रिय होत्या. 2008 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.

Nupur Sharma | Sarkarnama

Next : ऋषी सुनक यांच्या पराभवाची ही आहेत कारणं...