Rashmi Mane
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांचे निलंबन केले आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रात राजीव कुमार यांना पोलिस महासंचालक आणि आयजी या पदाxवरून हटवण्यात आले आहे.
कुमार हे ममता बॅनर्जी यांचे खास मानले जातात.
राजीव कुमार यांची गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम बंगाल सरकारने राज्याचे नवीन पोलिस महासंचालक (DGP) आणि पोलिस महानिरीक्षक (IGP) म्हणून नियुक्ती केली होती.
1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी कुमार यांनी आयआयटी रुरकी येथून अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.
कोलकाता पोलिस आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी सहआयुक्त आणि महासंचालक अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली, कोलकाता पोलिसांचे एसटीएफ माओवाद्यांविरुद्धच्या कारवायांसाठी खूप चर्चेत होत्या. लालगड चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती छत्रधर महतो यांना पकडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
R