Rashmi Mane
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानकपणे पंतप्रधानपदाचा राजीनामा देत, बांगलादेश सोडले असून भारतात दाखलं झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
सोमवारी ढाकात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे जवळजवळ 4 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडत आहे. शेख हसीना यांनी ढाका सोडले असून त्या पश्चिम बंगालमधून लष्करी हेलिकॉप्टरनं भारतात दाखल झाल्याचं बोललं जात आहे.
बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उर-जमान यांनी सांगितले की, पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. आता अंतरिम सरकार देश चालवेल.
लष्कर देशात शांतता प्रस्थापित करेल. अशा परिस्थितीत नागरिकांनी हिंसाचार करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 वेळा पंतप्रधानपद भूषवले आहे. बांगलादेशच्या नेत्या आणि अवामी लीग पक्षाच्या प्रमुख शेख हसीना यांना त्यांच्या समर्थकांनी 'आयर्न लेडी' ही पदवी दिली आहे.
शेख हसीना या बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची मोठी मुलगी आहे. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 ला झाला.
शेख हसीना या बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची मोठी मुलगी आहे. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 ला झाला. विद्यार्थी राजकारणातून राजकारणात प्रवेश केला आणि नंतर वडिलांचा पक्ष अवामी लीग या विद्यार्थी संघटनेची सूत्रे हाती घेतली.
विद्यार्थी दशेपासून राजकारणातून सक्रीय असणाऱ्या हसीना शेख यांनी 1966 मध्ये, विद्यार्थी संघाची निवडणूक लढवली आणि उपाध्यक्ष बनल्या. यानंतर त्या त्यांच्या वडिलांच्या पक्षात म्हणजेच अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेत सामील झाल्या.