Prajakta Bongale: महाराष्ट्राची लेक ठरली अमेरिकन सैन्यातील पहिली मराठी महिला! कोण आहेत प्राजक्ता बोंगाळे?

Mangesh Mahale

ऐतिहासिक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी अमेरिकन सैन्यात भरती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Prajakta Bongale Becomes First Marathi Woman in US Army | Sarkarnama

पहिल्या मराठी महिला

अमेरिकन लष्कराचे अत्यंत कठीण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत अमेरिकी सैन्यात दाखल होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला ठरल्या आहेत.

Prajakta Bongale Becomes First Marathi Woman in US Army | Sarkarnama

संधी हुकली

प्राजक्ता बोंगाळे यांचे बालपण दापोलीत गेले. एका अपघातामुळे भारतीय सैन्यात जाण्याची संधी हुकली. तरीही त्यांनी हार न मानता शिक्षण पूर्ण केले

Prajakta Bongale Becomes First Marathi Woman in US Army | Sarkarnama

किताब

अमेरिकेत स्थायिक होत क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट म्हणून यशस्वी कारकीर्द घडविली. विज्ञान क्षेत्राबरोबरच त्यांनी ‘यूएसए मिसेस मिडवेस्ट युनिव्हर्स’ हा किताब पटकावला.

Prajakta Bongale Becomes First Marathi Woman in US Army | Sarkarnama

वैद्यकीय विभाग

सध्या त्या अमेरिकन सैन्याच्या वैद्यकीय विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या या यशामागे पती समीर बोंगाळे आणि कुटुंबीयांचा आपल्याला मोलाचा पाठिंबा असल्याचे त्या सांगतात.

Prajakta Bongale Becomes First Marathi Woman in US Army | Sarkarnama

उल्लेखनीय यश

विज्ञान, सौंदर्य स्पर्धा आणि आता जागतिक लष्करी सेवेतही उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या प्राजक्ता या आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत.

Prajakta Bongale Becomes First Marathi Woman in US Army | Sarkarnama

‘मार्क्समनशिप पदक’

प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट नेमबाजीसाठी त्यांना ‘मार्क्समनशिप पदक’ प्रदान करण्यात आले. सर्वाधिक शैक्षणिक गुण मिळवत त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचीही छाप पाडली आहे.

Prajakta Bongale Becomes First Marathi Woman in US Army | Sarkarnama

अभिमान

प्राजक्ता यांची ही ऐतिहासिक कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशाने महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर आणखी उंचावले आहे.

Prajakta Bongale Becomes First Marathi Woman in US Army | Sarkarnama

NEXT: चार वेळा आमदार! आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा, आता शिवसेनेकडून उपसभापतीसाठी अर्ज, कोण आहेत सचिन

येथे क्लिक करा