Jagdish Patil
सर्किट बेंचला मंजूरी मिळाल्यामुळे मागील 40 वर्षांपासून सुरू असलेल्या कोल्हापुरकरांच्या लढ्याला यश आलं आहे.
सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मंजुरी दिल्यानंतर आज (ता.17) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होत आहे.
या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांना फायदा होणार असून लाखो याचिकाकर्त्यांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे.
देशाचे सरन्यायाधिशांच्या हस्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या उद्घाटन समारंभासाठी 6 जिल्ह्यातील जवळपास 3 हजार वकील उपस्थित राहणार आहेत.
सर्किट बेंच सीपीआरसमोरील 1874 मध्ये बांधलेल्या आणि कौटुंबिक न्यायालयासाठी वापरात असलेल्या इमारतीमध्ये सुरु होत आहे.
कोल्हापूर सर्किट बेंचचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये संपूर्ण अतिक्रमण काढून न्यायालयाच्या परिसराचा 25 दिवसात कायापालट केल्याचं दिसत आहे.
आज लोकार्पण झाल्यानंतर उद्यापासून कामकाज सुरु होत आहे. यासाठी स्टाफ नियुक्तीसह खटलेही वर्ग करण्यात आले आहेत.