वनतारामध्ये ‘माधुरी’ची कशी घेतली जातेय काळजी? अंबानींच्या संस्थेकडून आवाहनही...

Rajanand More

महादेवी (माधुरी)

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानुसार नुकतेच गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयामध्ये नेण्यात आले आहे.

Madhuri | Sarkarnama

'वनतारा'चे स्पष्टीकरण

हत्तीणीला वनतारामध्ये आणल्यानंतर कोल्हापुरकरांकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. त्यावर आता वनताराकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियात तिचे फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत.

Madhuri in Vantara | Sarkarnama

भावनांचा आदर

महादेवी हत्तीणीसोबत असलेल्या प्रेम आणि अध्यात्मिक भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळकते. तिची तेथील उपस्थिती केवळ प्रतिकात्मक नव्हती, तर पवित्र होती, असे वनताराने म्हटले आहे.

Madhuri in Vantara | Sarkarnama

रक्षण हाच हेतू

माधुरीच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू आहे, असे वनताराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संस्थेने माधुरीला दिल्या जाणाऱ्या खाद्याचा फोटोही पोस्ट केलाय.

Madhuri in Vantara | Sarkarnama

सन्मान राखला जाईल

कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत. तिच्या कल्याणासोबत समाजाच्या भावनांचाही सन्मान राखला जाईल, असे आश्वासन वनताराने दिले आहे.

Madhuri in Vantara | Sarkarnama

परंपरेच्या विरोधात नाही

वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुक्या जिवांच्या सेवसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत, असे वनताराच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Madhuri in Vantara | Sarkarnama

वचनबध्द

आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबध्द असल्याचे वनताराने स्पष्ट केले आहे.

Madhuri in Vantara | Sarkarnama

जनतेला आवाहन

आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही, तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्यासोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो, असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.  

Madhuri in Vantara | Sarkarnama

NEXT : माधुरी परत करा! माझ्याकडचे कुत्रे, म्हशी अंबानी वनतारात घेऊन जाणार का?

येथे क्लिक करा.