Jawhar Sircar : ममतांविरोधात थेट खासदाराकडूनच बंडाचे निशाण; कोण आहेत जवाहर सरकार?

Rajanand More

जवाहर सरकार

तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ममता बॅनर्जी यांनी त्यांना २०२१ मध्ये राज्यसभेवर पाठवले.

Jawhar Sircar | Sarkarnama

खासदारकीचा राजीनामा

सरकार यांची खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा. तसेच राजकारणातूनही संन्यास घेणार असल्याचे ममता बॅनर्जी यांना पत्राद्वारे कळवले.

Jawhar Sircar | Sarkarnama

रेप-मर्डर केस

कोलकाता येथील रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार-हत्या प्रकरणावरून ममता सरकारवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. या प्रकरणानंतर राजीनामा देणारे पहिले खासदार.

Jawhar Sircar | Sarkarnama

प्रसारभारतीचे सीईओ

प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नोटबंदीसह नरेंद्र मोदी सरकारच्या विविध धोरणांवर नाराजी व्यक्त करत 2016 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

Jawhar Sircar | Sarkarnama

 मोदींच्या धोरणांना विरोध

मोदी सरकारच्या विविध धोरणांचे कट्टर विरोधक म्हणून पाहिले जाते. सेवेत असतानाही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Jawhar Sircar | Sarkarnama

1975 मध्ये IAS

सरकार हे 1975 मध्ये आयएएस बनले. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये प्रमुख पदांवर काम केले आहे.

Jawhar Sircar | Sarkarnama

सचिव म्हणून काम

काँग्रेस तसेच भाजपच्या सत्ताकाळात त्यांनी विविध विभागांचे सचिव म्हणून काम केले. जवळपास 41 वर्षे या सेवेत होते.

Jawhar Sircar | Sarkarnama

पूर्वीच्या ममता दिसल्या नाहीत

रेप घटनेनंतर पूर्वीच्या ममता बॅनर्जींप्रमाणे तुम्ही तातडीने कारवाई कराल, असे वाटले होते. पण तसे झाले नाही. असे पत्रात म्हणत सरकार यांनी ममतांवर निशाणा साधत राजीनामा दिला.

Jawhar Sircar | Sarkarnama

NEXT : 'मविआ'च्या टार्गेटवर फडणवीसचं का?

येथे क्लिक करा.