सरकारनामा ब्यूरो
लग्नानंतर आपले आयुष्य बदलले, असे स्वप्न प्रत्येक मुलगी पाहत असते. मात्र, स्वप्न केवळ स्वप्नच राहिले असल्याचा अनुभव कोमल यांना आला.
कोमल गणात्रा यांचे वयाच्या २६ व्या वर्षी लग्न झाले होते. लग्नाच्या दोन आठवड्यानंतर त्याचा नवरा न्यूझीलंडला निघून गेला तो परत आलाच नाही. पती सोडून गेल्यावर त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. तरीही त्यांनी धीर सोडला नाही.
पती सोडून गेल्यानंतर खचून न जाता कोमलने IAS ची तयारी सुरू केली. तिने IAS व्हावे हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. कलेक्टर होण्यासाठी IAS ची परीक्षा दिली जाते.
कोमलने गुजराती माध्यमातून शिक्षण घेतले होते. वडिलांनी दिलेल्या प्रेरणेमुळे त्यांनी तीन वेगळवेगळ्या विद्यापीठातून तीन भाषांमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पती सोडून गेल्यानंतर त्यांना 5 हजार रुपयांवर शिक्षिकेची नोकरी मिळाली. आई-वडील आणि सासरपासून दूर राहून नोकरी करत असताना त्यांनी UPSC ची तयारी सुरू ठेवली.
मुख्य परीक्षेच्या वेळी कोमल यांना कामावरून सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी त्या मुंबईला आल्या आणि परीक्षा संपल्यानंतर पुन्हा गुजरातला जाऊन आपल्या शिक्षिकेच्या नोकरीवर रुजू झाल्या.
गुजराती साहित्यात टॉपर असलेल्या कोमल यांनी यूपीएससीची परीक्षा 2012 मध्ये उत्तीर्ण केली. त्यांचा रँक 591 रँक मिळाली. त्यांची निवड IRS साठी झाली.
सध्या कोमल गणात्रा या संरक्षण मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.