Ganesh Sonawane
दिग्गज तेलुगू अभिनेते आणि माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचं निधन वयाच्या 83 व्या वर्षी झालं.
त्यांचा जन्म 10 जुलै 1942 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कंकीपाडू येथे झाला होता.
1978 साली ‘प्राणम् खारीदू’ या तेलुगू चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून, तेलुगूसोबतच तमिळ आणि हिंदी चित्रपटांतही अभिनय केला.
त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना नऊ वेळा नंदी पुरस्कार मिळाला, जो आंध्र प्रदेश सरकारतर्फे दिला जातो.
2015 मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
अभिनयासोबतच त्यांनी राजकारणातही सहभाग घेतला आणि 1999 ते 2004 दरम्यान भाजपचे आमदार म्हणून विजयवाडा पूर्व मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि हे चित्रपटसृष्टीसाठी मोठं नुकसान असल्याचं सांगितलं.