Amol Sutar
पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला.
त्याला यश आले असून कोयना धरण "शिवसागर जलाशय' यावर मौजे मुनावळे, ता. जावळी, जि. सातारा येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन (Aquatic Tourism) विकसित करण्यात मान्यता मिळाली.
या कामासाठी 45 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाले आहे.
प्रकल्पाचे बांधकाम हे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ याच्यांद्वारे करण्यात येणार आहे.
जल पर्यटनाशी संबंधित कामकाज तसेच प्रकल्पाचे प्रचालन हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येईल.
प्रकल्पास 45.38 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिला टप्पा 8 महिन्यात आणि दुसरा टप्पा 20 महिन्यात पुर्ण करण्यात यावा.
जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याची कार्यवाही ही कोयना धरण 'अ' वर्ग प्रतिबंधित क्षेत्रात होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
पर्यटकांसाठी नियमानुसार आवश्यक त्या विमा सवलती व वैद्यकीय सोयी - सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
पर्यावरणाची हानी होणार नाही तसेच जलपर्यटन क्षेत्रात प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.