दरमहा 2,250 रुपये थेट खात्यात! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ कुणाला मिळणार?

Mangesh Mahale

१८ वर्षांपर्यंत लाभ

पात्र बालकांना सर्वसाधारणपणे वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत योजनेचा लाभ मिळू शकतो.

Savitribai Phule Child Care Scheme | Sarkarnama

दरमहा २,२५० रुपये

प्रत्येक पात्र बालकाला संगोपनासाठी दरमहा २,२५० रुपये परिपोषण अनुदान दिले जाते.

Savitribai Phule Child Care Scheme | Sarkarnama

संस्थेला २५० रुपये

बालकाचे संगोपन करणाऱ्या संबंधित स्वयंसेवी संस्थेला दरमहा २५० रुपये सहाय्यक अनुदान मिळते.

Savitribai Phule Child Care Scheme | Sarkarnama

२,५०० रुपयांची तरतूद

एका बालकासाठी दरमहा एकूण २,५०० रुपयांच्या अनुदानाची तरतूद आहे.

Savitribai Phule Child Care Scheme | Sarkarnama

कोणाला मिळतो लाभ?

अनाथ, एकल पालक असलेली, निराधार आणि कौटुंबिक किंवा सामाजिक संकटांचा सामना करणारी पात्र बालके या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.

Savitribai Phule Child Care Scheme | Sarkarnama

विशेष प्रवर्गांना १८ वर्षांपर्यंत लाभ

अनाथ, स्वतः दिव्यांग असलेली किंवा दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके, एचआयव्ही किंवा कर्करोगग्रस्त बालके, कुष्ठरोगग्रस्त पालकांची मुले आणि तीव्र मतिमंद बालकांना १८ वर्षांपर्यंत लाभ मिळू शकतो.

Savitribai Phule Child Care Scheme | Sarkarnama

कौटुंबिक कलहातील बालकांसाठी स्वतंत्र नियम

कौटुंबिक कलहामुळे संकटात सापडलेल्या बालकांना न्यायालयीन आदेशानंतर सहा महिन्यांपर्यंत किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत लाभ दिला जातो.

Savitribai Phule Child Care Scheme | Sarkarnama

महाडीबीटी २.० वर ऑनलाइन अर्ज

योजनेच्या अर्जासाठी आता महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Savitribai Phule Child Care Scheme | Sarkarnama

थेट बँक खात्यात अनुदान

लाभाची रक्कम DBT पद्धतीने पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे

Savitribai Phule Child Care Scheme | Sarkarnama

NEXT: दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन! 304 तालुक्यामध्ये होणार ही 10 कामे

येथे क्लिक करा