सरकारनामा ब्यूरो
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही देशातील सर्वात मोठी संरक्षण उपकरणे आणि उत्पादन पुरवठा करणारी कंपनी आहे
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीचे मार्केट कॅपिटल 2.63 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
एचएएलची स्थापना 23 डिसेंबर 1940 ला बेंगळुरूमध्ये झाली असून यात विमान, हेलिकॉप्टर्स, इंजिन आणि एव्हियोनिक्स यांचे उत्पादन केले जाते.
वालचंद ग्रुपचे संस्थापक वालचंद हिराचंद यांनी म्हैसूरचे राजा कृष्णराजा वाडियार चतुर्थ यांच्या मदतीने हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड या नावाने कंपनी सुरू केली.
असे म्हटले जाते की, राजा कृष्णराजा अमेरिकेहून परत आल्यानंतर HAL कारखान्यासाठी 700 एकर जमीन दिली आणि राज्याने 25 लाख रुपयांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकही केली.
HAL ने 1942 ला भारतीय हवाई दलासाठी Harlow PC-5, Curtiss P-36 Hawk आणि Vultee A-31 Vengeance या विमानांची निर्मिती करण्यास सुरू केली.
HAL ही देशातील आघाडीवर असलेली एरोस्पेस कंपनी आहे, जी हेलिकॉप्टर आणि एरो इंजिन,ALFA-S आणि CATS वॉरियर सारखे ड्रोनही येथे बनवले आहेत