Ganesh Sonawane
कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या साधूंच्या संघटित समूहांना आखाडा म्हणतात.
मूळ अर्थाने आखाडा म्हणजे कुस्ती आणि शस्त्रविद्येचा सराव करण्याची जागा, पण साधू-संन्याशांच्या संदर्भात त्याचा अर्थ साधनेचे, शिक्षणाचे आणि धर्मरक्षणाचे केंद्र असा झाला आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेने मान्यता दिलेले तेरा आखाडे कुंभ आणि सिंहस्थातील शाही (आता अमृत) स्नानात भाग घेतात.
त्यांच्या स्नानाचा क्रम आणि वेळा आखाडा परिषद आणि प्रशासन मिळून ठरवतात.
या तेरा आखाड्यांपैकी दहा आखाडे शैव आहेत आणि ते दशनामी संन्याशांच्या परंपरेतले असून भगवान शिवाची आणि शिवाशी जोडलेल्या देवतांची उपासना करतात.
तीन आखाडे वैष्णव किंवा बैरागी आहेत आणि त्यांचा संबंध विष्णू, विशेषतः श्रीराम आणि हनुमान, यांच्याशी आहे.
या आखाड्यांमध्ये महंत व साधूंना म्हणून काही अधिकार असतात
कुंभपर्वादरम्यान साधूंनी एकत्र येण्याची, निवासाची आणि भोजनाची व्यवस्था आखाड्यात केली जाते.
कुंभपर्वात एकूण १३ आखाडे सहभागी होतात. प्रत्येक आखाड्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते.