नागा साधूंचा जन्म कसा झाला? संन्याशांपासून योद्धे बनण्याची कहाणी

Ganesh Sonawane

कुंभपर्व आणि आद्य शंकराचार्य

आदि शंकराचार्यांनी वैदिक धर्माची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी देशभर धर्मप्रसार केला. भारतीय ज्ञानपरंपरेचा उत्सव असलेल्या कुंभपर्वात संन्याशांना सहभागी होण्यास त्यांनी प्रेरित केले.

Naga Sadhu History | Sarkarnama

चार दिशांना चार मठांची स्थापना

आदि शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना चार मठ स्थापन केले. या मठांमधून वैदिक ज्ञान, धर्म आणि संन्यासी परंपरेचा प्रसार केला जाऊ लागला.

Naga Sadhu History | Sarkarnama

दशनामी संप्रदायाची निर्मिती

शंकराचार्यांच्या संन्यासी शिष्यांचे दहा संघ तयार झाले. या संघांना विशिष्ट नावे देण्यात आली, त्यामुळे त्यांची परंपरा 'दशनामी संप्रदाय' म्हणून ओळखली जाऊ लागली.

Kumbh Mela in India | Sarkarnama

गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना

दशनामी संप्रदायातील साधू आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करत असत. वैराग्य, त्याग आणि आध्यात्मिक जीवन हे त्यांच्या दिनचर्येचे महत्त्वाचे भाग होते.

Naga Sadhu History | Sarkarnama

परकीय आक्रमणांमुळे बदलली भूमिका

पंरतु नंतरच्या काही शतकांमध्ये भारतावर परकीय आक्रमणे वाढली. बलपूर्वक केल्या जाणाऱ्या हिंसक धर्मप्रसाराला प्रतिकार करण्यासाठी काही संन्यासी संघांनी वेगळी भूमिका स्वीकारली.

Naga Sadhu History | Sarkarnama

संन्याशांचे योद्ध्यांमध्ये रूपांतर

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काही संन्याशांना योद्धा बनवण्यात आले. धर्म आणि परंपरेच्या रक्षणासाठी या साधूंच्या हातात शस्त्र देण्यात आली. त्यांना योद्धा बनवले.

Naga Sadhu History | Sarkarnama

नागा साधू म्हटले जाऊ लागले

योद्धा संन्यासींनाच नागा साधू म्हटले जाऊ लागले. त्यांची साधना आणि लढाऊ वृत्ती यामुळे ते वेगळे ओळखले जाऊ लागले.

Naga Sadhu History | Sarkarnama

मुघल सत्तेविरोधात नागा साधूंचा पराक्रम

नागा साधूंनी विविध काळात परकीय सत्तांच्या आक्रमणांविरोधात संघर्ष केला. मुघल सत्तेविरुद्धच्या लढ्यांमध्येही त्यांनी पराक्रम गाजवल्याचा इतिहास सांगितला जातो.

Naga Sadhu History | Sarkarnama

NEXT : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी किती जुनी आहे? चीनी प्रवासी अन् पाच लाख लोकांच्या उपस्थितीचा ऐतिहासिक दाखला!

येथे क्लिक करा