Ganesh Sonawane
कुंभपर्वाच्या आयोजनामागे समुद्रमंथनाची महत्त्वाची पौराणिक कथा सांगितली जाते. रामायण, महाभारत आणि पुराणांमध्ये या कथेचा उल्लेख आढळतो.
पौराणिक कथेनुसार, अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्राचे मंथन केले. या प्रक्रियेला अमृतमंथन असेही म्हटले जाते.
समुद्रमंथनातून अमृताने भरलेला कलश बाहेर आला. या अमृतकुंभासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष झाल्याची कथा सांगितली जाते.
पौराणिक कथेनुसार, देवांनी दानवांकडून अमृताचा कलश मिळवला. हा कलश स्वर्गात नेत असताना त्यातील अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले.
अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी पडल्याची मान्यता आहे. त्यामुळे ही चारही तीर्थक्षेत्रे पवित्र मानली जातात.
अमृताचे थेंब पडल्याच्या पौराणिक मान्यतेनुसार या चार ठिकाणी कुंभपर्वाचे आयोजन केले जाते. हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन ही कुंभमेळ्याची चार प्रमुख स्थळे आहेत.
या चारही ठिकाणी आलटून-पालटून साधारण तीन वर्षांच्या अंतराने कुंभपर्व साजरे होते. त्यामुळे एका तीर्थक्षेत्री पुन्हा कुंभमेळा भरण्यास साधारण १२ वर्षांचा कालावधी लागतो.
कुंभपर्वात कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो भाविक सहभागी होतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील ज्ञानसाधक एकत्र येऊन भारतीय ज्ञानपरंपरेतील विविध विचारांचे आदान-प्रदान करतात.