kumbh Mela Logo : त्रिशूळ, मंदिर अन् नदी...कुंभमेळ्याचे बोधचिन्ह आहे खास, एकदा फोटो पाहाच!

Roshan More

कुंभमेळा

नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बोधचिन्ह निश्चित करण्यात आले आहे.

Kumbh Mela | Sarkarnama

बोधचिन्ह

राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेतून बोधचिन्हाची निवड करण्यात आली. अध्यात्मिक चिन्हांचा यामध्ये समावेश आहे.

kumbh Mela Logo | sarkarnama

अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण झाले.

kumbh Mela Logo | sarkarnama

सिंहस्थ परंपरेचे दर्शन

बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते.

kumbh Mela Logo | sarkarnama

त्रिशुळ, मंदिर, नदी

भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरुपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे.

kumbh Mela Logo | sarkarnama

झळकले बोधचिन्ह

'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'चे अधिकृत बोधचिन्ह मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या इमारतीवर झळकावण्यात आले.

kumbh Mela Logo | sarkarnama

NEXT : महाराष्ट्रातील सात आश्चर्ये माहिती आहेत का? वाचा एका क्लिकवर...

येथे क्लिक करा