Rajanand More
महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची निवड जून २००३ मध्ये जगभरातून घेतलेल्या मतांच्या आधारावर करण्यात आली. सात ज्युरींनी सुमारे ४०० स्थळांमधून चौदा स्थळे निवडली होती. त्यानंतर मतदानाद्वारे अंतिम सात आश्चर्यांची निवड करण्यात आली. कोणती आहे ही आश्चर्ये?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची मुख्य राजधानी रायगड. रायगडावरच महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. १९५६ मध्ये हा किल्ला स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांकडून रायगड असे नामकरण.
अजिंठालेणींचा इतिहास खूप पुरातन असून या लेण्यांचा उपयोग बौद्ध साधकांनी ध्यान आणि पूजा करण्यासाठी केला होता. लेणींचे मुख्य उद्दिष्ट बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी होते. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईतील ऐतिहासिक रेल्वेस्थानक. २००४ मध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे आणि बेसाल्ट खडकातील एकमेव खारे व अल्कली पाण्याचे विवर सरोवर आहे. हे एक वैज्ञानिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे.
आशिया खंडातील सर्वात उंच दगडी बांधकाम असलेला हा स्तूप मुंबईतील गोराई येथे आहे.विपश्यना ध्यान धारणेचे महत्वाचे केंद्र मानले जाते.
यादव राजवंशातील भिल्लम पाचव्यानं बाराव्या शतकात हा अभेद्य किल्ला बांधला होता. २०० मीटर उंच डोंगरावर वसलेला हा किल्ला निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या संरक्षण यंत्रणांनी सुसज्ज होता. दौलताबाद किल्ला म्हणून ओळखले जाते.
सातारा जिल्ह्यातील हे पठार सुमारे १२०० मीटर उंचीवर असून पावसाळ्यात रंगीबेरंगी फुलांनी बहरून जाते, त्यामुळे याला “महाराष्ट्राची फूलांची दरी” असेही म्हणतात. जागतिक वारसास्थळाचा दर्जा.