Ganesh Sonawane
नाशिक आयटीआय मध्ये प्रथमच ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ कोर्स सुरू होतोय. कुंभमेळ्यासाठी प्रशिक्षित पुजारी घडवण्याचे हे पहिले पाऊल.
२०२६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरोहितांची कमतरता भासू नये व पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून हा अनोखा कोर्स राबविण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून, मुलाखतीतून विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल.
अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मंत्रोच्चार, संस्कार आणि पारंपरिक विधींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आयटीआयमध्ये आता तांत्रिक कौशल्याबरोबर वैदिक संस्कारांचंही धडे मिळणार — विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम!
हा कोर्स ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या राज्य शासनाच्या योजनेतून राबविला जात आहे.
कुंभमेळ्यात प्रशिक्षित पुजाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार — त्यामुळे हा कोर्स करिअरसाठीही उपयुक्त ठरणार.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात पुरोहितांची कमतरता भासली होती. नाशिकमध्ये तसे होऊ नये म्हणूनच हा कोर्स सुरु केला आहे.