कुंभमेळ्याच्या कामांना विधानपरिषदेच्या आचारसंहितेतून वगळलं, काय म्हटलेय आदेशात?

Ganesh Sonawane

कुंभमेळा कामे

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमधून नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासह इतर तातडीच्या कामांना वगळण्यात आले आहे.

Nashik Kumbh Mela | Sarkarnama

नगरविकास विभाग

निवडणूक आयोगाच्या संमतीने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने आदेश काढले. त्यामुळे सिंहस्थ कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Kumbh Mela 2027 | Sarkarnama

विनंती पत्र

सिंहस्थ तयारीत विघ्न येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्य शासनाला पत्र देत कुंभमेळा व इतर तातडीच्या कामांना आचारसंहितेतून वगळण्याची विनंती केली होती.

Nashik Kumbh Mela | Sarkarnama

आयोगाला प्रस्ताव

त्यानुसार राज्य सरकारने हा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे पाठविला होता.

election commission of india

हिरवा कंदील

२२ मेस निवडणूक आयोगाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला.

Election Commission | Sarkarnama

कामांना सवलत

त्यानुसार, कुंभमेळ्याशी संबंधित चालू आणि प्रस्तावित कामांना आचारसंहितेच्या निर्बंधातून सवलत दिली आहे.

Kumbh Mela 2027 | Sarkarnama

कामे सुरु राहतील

नाशिक शहर व तालुक्यातील जनहिताच्या कामांनाही आचारसंहितेतून वगळण्यात आले आहे. कुंभमेळा प्राधिकरणांतर्गत सर्व विकासकामे कोणतीही अडचण न येता सुरू राहतील.

Kumbh Mela 2027

कामांना गती

त्यामुळे सिंहस्थाच्या अनुषंगाने सुरू असलेली रस्ते रुंदीकरण, घाट सुधारणा, पाणीपुरवठा योजना तसेच भाविकांच्या सोयी-सुविधांशी संबंधित विकासकामांना गती मिळेल.

Girish Mahajan Nashik Kumbh Mela Preparations | Sarkarnama

NEXT : शेतकऱ्यांना दिलासा! कांदा खरेदी दरात वाढ; उद्यापासून असणार 'हा' नवा दर

Onion Bhavan
येथे क्लिक करा