सरकारनामा ब्युरो
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं सादर केल्याने कुणाल कामरा वादात सापडला आहे.
2018 मध्ये मुस्लिम, शीख आणि मदर तेरेसा यांच्याबद्दलचे काही ट्वीटस व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याने त्याचं ट्विटर अकाऊंट डिलिट केले होते. मुंबई सोडून तो गुडगावला राहण्यासाठी गेला होता.
2020 मध्ये एका मुलाच्या व्हिडीओचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी वापर केला होता. त्यावेळी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण हक्क आयोगाच्या आदेशानुसार त्याने पोस्ट डिलिट केली होती.
2020 मध्ये कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमान प्रवासादरम्यान प्रश्न विचारून त्रास दिला होता. यानंतर विमान कंपन्यांनी त्याला प्रवास बंदी केली होती.
नोव्हेंबर 2020 मध्ये कुणालने सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. न्यायालयाने सांगितलेली ट्वीट डिलिट करण्यासही नकार दिला होता. त्यामुळे त्याच्यावर अवमान कारवाई सुरू केली होती.
एप्रिल 2024 मध्ये कुणालने अभिनेता सलमान खान आणि बिग-बॉस शोवर जोक्स केला होता. त्यावेळी पण कामराने माफी मागण्यास नकार दिला होता.
ओला कंपनीचे सीईओ भाविष अग्रवाल यांच्यावर कामाच्या पद्धतीबद्दल टीका केली होती. त्यावरून अग्रवाल आणि कामरा यांच्यात जोरदार वाद झाला होता.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केल्यामुळेही कुणाल कामरा वादात सापडला होता.
केंद्र सरकारने अर्थ सचिवपदी नियुक्त केलेले अजय सेठ आहेत तरी कोण?