Mayur Ratnaparkhe
केंद्र सरकारने अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यांची नवीन अर्थ सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नियुक्ती समितीने अजय सेठ यांच्या नावाबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
अजय सेठ हे तुहिन कांता पांडे यांची जागा घेणार आहेत. कारण, पांडे यांची SEBI च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.
अजय सेठ हे १९८७ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
अजय सेठ यांनी एप्रिल २०२१ मध्ये अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
या महिन्याच्या सुरुवातीला अजय सेठ महसूल विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला.
अजय सेठ यांनी जवळजवळ ३० वर्षे सार्वजनिक वित्त, कर आकारणी, सामाजिक क्षेत्र प्रशासन यासारख्या क्षेत्रात काम केले आहे.
अजय सेठ यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या सरकारी पदांवर काम केलेले आहे.
अजय सेठ यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी आयआयटी रुरकी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले आहे. तसेच अॅटेनियो डी मनिला विद्यापीठातून एमबीए पदवी देखील मिळवली आहे.