Rashmi Mane
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या मागणीमागचा इतिहास नेमका काय आहे?
मराठा आरक्षणाच्या चर्चेत जुन्या कुणबी नोंदी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. विशेषतः निजामकालीन कागदपत्रांमध्ये ‘मराठा-कुणबी’ आणि ‘कुणबी-मराठा’ अशा नोंदी आढळल्याचा दावा केला जातो.
निजामकालीन कागदपत्रांमधील नोंदींना मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत महत्त्व मिळाले आहे.
न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने जुन्या अभिलेखांचा शोध घेतला. या शिफारशींनंतर कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी प्रक्रिया पुढे आली.
कुटुंबातील पूर्वजांच्या जुन्या नोंदी पुराव्याद्वारे सिद्ध झाल्यास पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
सगेसोयरे संकल्पनेत नोंद असलेल्या व्यक्तीच्या पात्र रक्ताच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्याची मागणी केंद्रस्थानी आहे.
मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गातून व्यापक आरक्षणाची मागणी कायम आहे. दुसरीकडे ओबीसी संघटनांकडून विद्यमान आरक्षणावर परिणाम होऊ नये, अशी भूमिका मांडली जात आहे.