राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारापर्यंत झेप ; नाशिक मनपा शाळेचा कायापालट करणाऱ्या कुंदा मॅडमची गोष्ट

Ganesh Sonawane

२० वर्षांचे ‘शैक्षणिक पालकत्व’

२००५ पासून कुंदा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
वंचित मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक आणि शैक्षणिक आधार उभा केला.

Kunda Bachhav, National Teacher Award 2026 | Sarkarnama

१५० मुलींच्या शिक्षणाला आधार

‘शैक्षणिक पालकत्व’ उपक्रमातून १५० हून अधिक वंचित मुलींना मदत केली.
या मदतीमुळे अनेक मुलींचे बालविवाह रोखले आणि उच्च शिक्षणाची वाट खुली झाली.

Kunda Bachhav, National Teacher Award 2026 | Sarkarnama

गावाच्या भिंती झाल्या ‘ज्ञानभिंती’

आनंदवलीतील ३० ते ३५ घरांच्या भिंतींवर नकाशे, इंग्रजी शब्द आणि गणिताची सूत्रे रंगवली. मोबाईलऐवजी मुलांना भिंतीवरील मजकूर वाचण्याची आणि कोडी सोडवण्याची सवय लागली.

Kunda Bachhav, National Teacher Award 2026 | Sarkarnama

शाळेबाहेरही सुरू झाले शिक्षण

‘ज्ञानभिंतीं’मुळे संपूर्ण गावच विद्यार्थ्यांसाठी खुल्या वर्गखोलीत बदलले.
पुस्तकांपुरते शिक्षण न ठेवता रोजच्या परिसराला त्यांनी शिकण्याचे माध्यम बनवले.

Kunda Bachhav, National Teacher Award 2026 | Sarkarnama

लोकसहभागातून उभारले ₹५५ लाख

समुदाय आणि CSRच्या माध्यमातून त्यांनी शाळेसाठी ५५ लाखांहून अधिक रुपयांचा निधी उभारला. या माध्यमातून महापालिका शाळेला डिजिटल साधनांसह ‘स्मार्ट आणि मॉडेल स्कूल’ बनवले.

Kunda Bachhav, National Teacher Award 2026 | Sarkarnama

संविधानाची ‘सापशिडी’ अन् स्मार्ट अटेंडन्स

विद्यार्थ्यांना संविधान समजावे यासाठी त्यांनी ‘संविधान सापशिडी’चा अभिनव प्रयोग केला. मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘स्मार्ट अटेंडन्स’सह मूल्यमापन शिडीही राबवली.

Kunda Bachhav, National Teacher Award 2026 | Sarkarnama

महापालिका शाळेतील मुलांची थेट ISRO भेट

लोकसहभागातून विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) भेट घडवून आणली. सामान्य महापालिका शाळेतील मुलांना अंतराळ विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

Kunda Bachhav, National Teacher Award 2026 | Sarkarnama

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

कुंदा बच्छाव यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ जाहीर झाला.
५ सप्टेंबरला विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला.

Kunda Bachhav, National Teacher Award 2026 | Sarkarnama

उल्लेखनीय कार्य

गेल्या २० वर्षांपासून नाशिक येथील आनंदवलीच्या एनएमसी शाळा क्रमांक १८ मधील कुंदा जयवंत बच्छाव यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला नाविन्यपूर्ण आणि समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

Kunda Bachhav, National Teacher Award 2026 | Sarkarnama

NEXT : ‘फाशी घेण्याची वेळ आली तरी तयार’; जरांगे पाटलांचे आंदोलन हाताळणाऱ्या IAS आशिमा मित्तल कोण?

येथे क्लिक करा