Roshan More
इंद्रायणी नदीवरील तळेगावजवळी कुंडमळा येथे पर्यटकांसह पूल कोसळला.
पूल कोसळल्याने तब्बल चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, 40 पर्यटक वाहून गेले आहेत.
या दुर्घटनेत वाहून गेलेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे 2 पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMRDA चे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्थांच्या मदतीने बचावकार्य राबवले जात आहे.
या दुर्घटनेमधून 38 व्यक्तींचा वाचवण्यात आले आहे.
पूलाच्या खाली लोक अडकले आहेत. त्यांना काढण्यासाठी बचाव दल प्रयत्न करत आहे.
दुर्घटना दुपारी साडेतीनवाजता घडली. तेव्हापासून बचाव कार्य सुरू आहे.दरम्यान, अंधारामुळे बचावकार्यात अडथळा येत होता.