Rajanand More
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता काबीज केली होती. या निवडणुकीत आणखी एक इतिहास घडला होता.
केरळमध्ये भाजपचा पहिला खासदार या निवडणुकीत विजयी झाला होता. त्रिशुर मतदारसंघातून अभिनेते सुरेश गोपी यांनी ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच भाजपचे खाते उघडले.
गोपी यांना विजयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच बक्षीसही दिले. गोपी यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद देण्यात आले.
सुरेश गोपी यांचा विजय आता वादात अडकला आहे. त्यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका केरळ हायकोर्टात दाखल झाली आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोपी यांनी भ्रष्ट आचरण करून मते मिळविल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
गोपी यांनी याचिकेला आव्हान देत त्यात करण्यात आलेल्या आरोपांना कोणताही आधार नसल्याचे म्हटले होते. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली.
गोपी यांच्याविरोधात आता नियमितपणे खटला चालणार आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांकडून गोपी यांच्याविरोधात पुरावे सादर केले जातील. गोपी यांच्याकडून ते खोडून काढण्याचा प्रयत्न होईल.
खटल्यामुळे आता गोपी यांची ऐतिहासिक खासदारकी पणाला लागली आहे. कोर्टात त्यांच्याविरोधात निकाल गेल्यास निवडणुकीचा निकाल रद्द होईल.