Deepak Kulkarni
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले व्याही व बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांना 'क्रेडाई'ची अध्यक्ष आता एका महिलेला करा, असा मिश्किल सल्ला दिला. यावेळी त्यांनी मगर यांना तुमची मुलगी माझी सून आहे, अशी आठवणही करुन दिली.
सतीश मगर यांच्या कन्या असलेल्या कुंती या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पत्नी आहेत.
कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून अर्थशास्र आणि गुंतवणूक या विषयात पदवी संपादन प्राप्त केली आहे.
कुंती या नेहमीच आमदार रोहित पवारांच्या प्रत्येक महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होताना दिसून येतात.
रोहित आपल्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर क्वचितच व्यक्त होतात. पण ते आपल्या आयुष्यात खंबीर साथ देणारी सहचारिणी म्हणून कुंती पवारांंचं मनभरुन कौतुकही करतात.
क्रेडाई या संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्यातच अजितदादांनी व्याही सतीश मगर यांना सल्ला दिला. ज्यामुळे कुंती मगर-पवार याही चर्चेत आल्या आहेत.
माझ्या आयुष्यात ज्या दोन महिलांचा प्रभाव आहे, त्यात आई आणि तू आहेस. तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून मुलं मोठी होईपर्यंत गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं,अशा शब्दांत कुंती पवारांचं
रोहित पवार यांनी अजितदादांविषयी एकदा मनमोकळ्या गप्पा मारताना 'राजकीय क्षेत्रात आपला प्रवेश झाल्याचं खुद्द अजित पवार यांनीच जाहीर केलं होतं. इतकंच नाही तर खासगी आयुष्यातही अनेकदा दादांची मदत झाल्याचं रोहित हे मोठेपणानं मान्यही करतात.
आपला आणि आपली पत्नी कुंती मगर-पवार यांचा विवाह ठरवण्यासाठी दादांचा मोठा हातभार होता, असं सांगतानाच पार्थ आणि आपल्यात कुठलीही स्पर्धा नाही, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांच्या कन्या असलेल्या कुंती यांचा 2012 रोजी रोहित पवार यांंच्याशी विवाह झाला. त्यांना आनंदिता आणि शिवांश ही दोन मुलं आहेत.