'लाडकी'साठी e-KYC लिंक अन् अर्ज, नवीन बदल जाणून घ्या; 15 ऑगस्टपूर्वी हप्ता!

Pradeep Pendhare

अंतिम यादी निश्चित

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सक्तीच्या ई-केवायसी (e-KYC) आणि पडताळणीमुळे अपात्र महिलांना वगळून 1.66 कोटी लाभार्थींची अंतिम यादी निश्चित केली आहे.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

ऑगस्टचा हप्ता

दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ सुरूच असून ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधन सणाच्या पूर्वी 12 ते 15 ऑगस्टपूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

अर्जांवर कारवाई

या योजनेचा लाभ काही पुरुष आणि नको असलेल्या घटकांनी घेतल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने निकष आणखी कठोर केले आहेत.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

निकष

आयकर दाते, शासकीय नोकरदार कुटुंबे आणि चारचाकी वाहने असणाऱ्यांना यादीतून बाहेर काढले गेले आहे.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

फेरपडताळणी

ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करूनही ज्या पात्र महिलांचे हप्ते अचानक बंद झाले होते, त्यांच्या अर्जांची पुन्हा खात्री केली जात आहे. जेणेकरून त्यांना पुन्हा लाभ मिळू शकेल.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

सध्याचा निधी

आता राज्यभरात 1 कोटी 66 लाख पात्र महिलांना दरमहा नियमितपणे 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

लाभार्थी वगळले

राज्यव्यापी छाननी आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर 92 लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरवून लाभार्थी यादीतून वगळले आहेत.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

अर्ज उपलब्ध

लाडकी बहीण योजनेचा अर्ज महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध आहे. याच ठिकाणी ई-केवायसीची लिंक आहे.

Ladki Bahin Yojana | Sakarnama

Next : बँक व्यवहार करताय? फॉलो करा 5 सोप्या टिप्स; तुमचे पैसे राहतील 100% सुरक्षित!

येथे क्लिक करा