Rashmi Mane
महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या नवी अपडेट.
महायुती सरकारकडून महिलांसाठी सुरु असलेली लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणावर महिलांना आर्थिक मदत मिळते.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 दिले जात आहेत. जून 2024 पासून ही योजना सुरु झाली आहे.
जुलै 2025 पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. पण आता ऑगस्ट 2025 चा हप्ता मिळण्यात उशीर झाला आहे.
सप्टेंबर महिना सुरु असूनही महिलांच्या खात्यात ऑगस्टचा 1500 हप्ता आला नाही.
यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ऑगस्टचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल.
ऑगस्ट व सप्टेंबरचा मिळून 3000 एकत्र जमा होणार का? पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
या योजने संदर्भातील दुसरा मोठा प्रश्न म्हणजे 2100 कधी मिळणार? त्यावर जाहिरनाम्यातील आश्वासन पूर्ण होईल, असं सरकारचं म्हणणं आहे.