Rashmi Mane
मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांसाठी एसी लोकल प्रवास आता होणार वेगवान आणि गार.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) 2,856 एसी डब्यांच्या खरेदीसाठी मोठी तयारी केली आहे.
एकूण 238 लोकल्स तयार होणार असून या लोकल्सचे डबे वंदे ट्रेन किंवा मेट्रो सारखे असणार आहेत.
राज्य सरकारने नुकतीच 19,293 कोटींचा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
या रेल्वे प्रकल्पासाठी भिवपुरी (मध्य रेल्वे) आणि वाणगाव (पश्चिम रेल्वे) येथे दोन नवीन कारशेड उभारली जाणार आहेत.
या रेल्वेत स्मार्ट एचव्हीएसी प्रणाली असणार आहे. त्यासोबत गादीयुक्त आरामदायी आसने देखील असणार आहे. वाढीव विद्युत शक्तीमुळे वेग 110 किमी/तास वरून 130 किमी/तास अधिक वेगामुळे स्थानकांवरील वेळेचा अपव्यय कमी होणार आहे. त्यामुळे अधिक सुरक्षित व आरामदायी प्रवास असणार आहे.
या लोकल ट्रेनमध्ये गर्दीप्रमाणे तापमान नियंत्रित करणारी व्यवस्था आणि बंद दरवाजे असलेली सुरक्षित रचना असणार आहे.