Jagdish Patil
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
महाराष्ट्रावर 7 लाख 80 हजार कोटींचं कर्ज असून यावर्षीचं 1 लाख 10 हजार कोटींचं कर्ज हे वेगळं असल्याचं पवारांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना ते म्हणाले, "बहीण-भावांचा विचार होतोय याचा आनंद. पण, हा सगळा चमत्कार लोकसभा निकालातील मतदारांच्या मतांचा आहे."
"मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण-भाऊ सर्वांची अडचण होते. मला एकच काळजी आहे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे?"
पवार म्हणाले, भुजबळांनी काही भाषणामध्ये माझ्या विषयी आस्था व्यक्ती केली. त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्राचे हित असणाऱ्या गोष्टीत तुम्ही पाहिजे आहात.
मात्र, सरकारने मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलनकर्त्यांना काय आश्वासन दिली, हे समजल्याशिवाय चर्चा करण्यात काही अर्थ नसल्याचं पवार म्हणाले.
राज ठाकरेंनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना, "महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे." असं ट्विट केलं आहे.
राज यांची ट्विटवरुन पवारांनी खिल्ली उडवली. राज ठाकरे 8-10 दिवसांनी, महिन्यांनी जागे झाले की उठतात आणि बोलतात, असं ते म्हणाले.
कर्नाटक सरकारचा नोकरीत 80 टक्के आरक्षण भूमिपुत्रांना देण्याचा निर्णय कोर्टात टिकणार नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले.