Rashmi Mane
लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
केवायसी न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे योजनेत काही लाभार्थ्यांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
केवायसी प्रक्रियेत, महिलांचे आणि पतीचे आणि लग्न न झालेल्या मुलींचे वडीलांचे आधार नंबर टाकणे अनिवार्य आहे. लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर येणारी ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागते.
इतर आवश्यक कागदपत्रांचेही तपशील भरावे लागतील आणि त्यांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावरच केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
सरकारने लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
अलिकडेच झालेल्या पडताळणीमध्ये असे दिसून आले आहे की, लाडकी बहीण योजनेतून सुमारे 26 लाखांपेक्षा अधिक महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. याप्रकरणी योजनेसाठी पुन्हा एकदा पडताळणी सुरू करण्यात आली आहे