Rashmi Mane
राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या सर्व महिलांना आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, योजनेत पारदर्शकता आणि नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्व लाभार्थींनी ही प्रक्रिया 18 सप्टेंबरपासून पुढील दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी.
सर्व लाभार्थींनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
वेबसाईटला भेट द्या, “लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा” या पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक नोंदवा त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि आधार प्रमाणी करणासाठी संमती द्या.
“मी सहमत आहे” क्लिक करा. मग आधार मोबाईलवर ओटीपी मिळेल आणि ओटीपी नोंदवून प्रक्रिया पूर्ण करा.
ई-केवायसी पूर्ण केल्याने योजनेत नियमित लाभ मिळेल. भविष्यातील इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवता येईल आणि पारदर्शकता आणि सुलभता सुनिश्चित होईल.