Rashmi Mane
महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे!
जर तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता वेळेत हवा असेल, तर तुम्हाला ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहे.
विशेष म्हणजे, यासाठी तुमच्याकडे आता फक्त 12 दिवस उरले आहे. तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास, तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो.
ई-केवायसी करण्यासाठी महिलांना खालील महत्त्वाची कागदपत्रे लागतील.
कागदपत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दस्ताऐवज म्हणजे अर्जदाराचे आधार कार्ड. आणि आधार लिंक असलेले बँक खात्याचा तपशील.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला. (पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका (रेशन कार्ड) असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.) तसेच लाभार्थी महिलेचा फोटो (लेटेस्ट पासपोर्ट साईज) शिधापत्रिका (रेशन कार्ड).
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Proof) हे उपलब्ध नसल्यास 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र (Voter ID), जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र चालेल.
विवाह प्रमाणपत्र आणि अर्जदाराचे हमीपत्र.