Rashmi Mane
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत! राज्यभरातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींमध्ये लोकशाहीचा जल्लोष रंगणार आहे.
या निवडणुका 2 डिसेंबर 2025ला पार पडणार आहेत. तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मतदारांनी आपल्या हक्काचा वापर नक्की करावा!
या सर्व स्थानिक संस्थांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय कार्यक्रम, शासकीय घोषणा आणि निधी वितरणावर बंदी लागू झाली आहे.
उमेदवारांना 10 ते 18 नोव्हेंबर दरम्यान अर्ज करता येणार आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचा आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर https://mahasecelec.in जाऊन, पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून नंतर अर्ज भरावा लागेल. त्यानंतर भरलेला अर्ज प्रिंट करून निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावा लागेल.
एका प्रभागातून एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार अर्ज भरता येतील. अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर.
निवडणुकीच्या खर्चावर आयोगाने मर्यादा वाढवली आहे. अ वर्गाच्या नगरपरिषद अध्यक्षांसाठी 15 लाख, सदस्यांसाठी 9 लाख रुपये मर्यादा असेल.
ब वर्ग अध्यक्ष – 11.25 लाख, सदस्य – 3.5 लाख, क वर्ग: अध्यक्ष – 7.5 लाख, सदस्य – 2.5 लाख, ड वर्ग: अध्यक्ष – 6 लाख, सदस्य – 2.25 लाख