लाडक्या बहिणींनो, 1 चूक अन् 1500 रुपये तर सोडाच, बँकेतील सगळे पैसे गायब होतील! काय आहे e-KYC चं सत्य?

Rashmi Mane

बनावट e-KYC लिंकपासून सावध!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाने सध्या बनावट e-KYC लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यास वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

Mazi Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

नंदुरबारमध्ये प्रकार उघड

नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या नावाने नवीन e-KYC लिंक समोर आली आहे. मात्र ही लिंक बनावट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

सरकारकडून कोणताही आदेश नाही!

योजनेसाठी नव्याने e-KYC सुरू झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत. मात्र याबाबत शासनाकडून कोणतेही अधिकृत निर्देश प्राप्त झालेले नाहीत.

एका क्लिकने होऊ शकते फसवणूक

अनोळखी लिंक उघडल्यास सायबर भामटे तुमची गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अशा लिंकपासून दूर राहा.

Mazi Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

ही माहिती अजिबात देऊ नका

आधार क्रमांक, बँक खाते तपशील, ATM PIN, पासवर्ड किंवा मोबाईलवर आलेला OTP कोणालाही सांगू नका.

1500 रुपयांच्या आमिषाला बळी पडू नका

योजनेचे पैसे सुरू ठेवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तातडीने लिंकवर माहिती भरा, असे सांगणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.

अधिकृत माहिती कुठे मिळेल?

योजनेतील बदल किंवा e-KYC बाबतची माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि स्थानिक प्रशासनाकडूनच तपासा.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

इतर महिलांनाही सावध करा!

बनावट लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद मेसेज पुढे पाठवू नका. स्वतः सुरक्षित राहा आणि लाडक्या बहिणींनाही या सायबर फसवणुकीपासून सावध करा.

Mazi Ladki Bahin Yojana scam | Sarkarnama

Next : शेतकऱ्यांनो, मोबाईलवरून 5 मिनिटांत फार्मर आयडी e-KYC करा; पाहा Step-by-Step संपूर्ण प्रक्रिया!

Farmer ID e-KYC | sarkarnama
येथे क्लिक करा