शेतकऱ्यांनो, मोबाईलवरून 5 मिनिटांत फार्मर आयडी e-KYC करा; पाहा Step-by-Step संपूर्ण प्रक्रिया!

Mangesh Mahale

ॲप डाउनलोड

सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत AgriStack Farmer Registry पोर्टलवर (mhfr.agristack.gov.in) जा. (किंवा गुगल प्ले स्टोअरवरून ‘Farmer Registry MH’ हे अधिकृत ॲप डाउनलोड करा).

Farmer ID e-KYC | sarkarnama

Farmer Login

होमपेजवर ‘Farmer’ हा पर्याय निवडा. जर तुमचे खाते नसेल तर ‘Create New User Account’ वर क्लिक करा, आणि आधीच खाते असेल तर मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून ‘Farmer Login’ करा.

Farmer ID e-KYC | sarkarnama

OTP

नवीन नोंदणी किंवा e-KYC अपडेट करण्यासाठी तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका आणि आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून पडताळणी (Verify) करा.

Farmer ID e-KYC | sarkarnama

व्हेरिफाय

तुमची आधारवरील माहिती आपोआप स्क्रीनवर दिसेल. आता तुमचा चालू मोबाईल नंबर टाकून तोही OTP द्वारे व्हेरिफाय करा.

Farmer ID e-KYC | sarkarnama

Details

पुढे ‘Land Ownership Details’ मध्ये जाऊन तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि सातबाऱ्यावरील गट/सर्व्हे नंबर निवडा. तुमची एकापेक्षा जास्त गावांत जमीन असेल, तर सर्व गट नंबर जोडून घ्या.

Farmer ID e-KYC | sarkarnama

‘Submit’

सर्व माहिती अचूक तपासल्यानंतर खाली दिलेल्या संमती (Consent) चौकोनावर टिक करा आणि आधार e-Sign द्वारे ‘Submit’ बटणावर क्लिक करा.

Farmer ID e-KYC | sarkarnama

e-KYC

सबमिट करताच तुम्हाला पोचपावती (Enrolment Number) मिळेल. महसूल अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर तुमचा फार्मर आयडी आणि e-KYC पूर्ण होईल.

Farmer ID e-KYC | sarkarnama

NEXT: वय वंदना कार्ड कसे काढाल? घरबसल्या करा अर्ज; ज्येष्ठांना १० लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण!

येथे क्लिक करा