Rashmi Mane
2024 मध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीणन योजनेने दरमहा महिलांना 1500 दिले आहेत. मात्र, जुलै 2025 चा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र (3000 रुपये) मिळणार का डबल हप्ता?
30 जुलै 2025ला राज्याच्या महिला व बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी शासन निर्णय जाहीर करत 2984 कोटी रुपये वर्ग केले आहेत.
त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे त्याआधी जुलै व ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या वर्षी 17 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात असाच शुभारंभ झाला होता, जिथे 3000 रुपये जमा करण्यात आले होते.
या योजनेला एक वर्ष झाले आहेत. या योजनेंतर्गत महिलांना 13वा हप्ता मिळणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातील कोट्यवधी महिलांना मिळतोय आर्थिक आधार. महिलांसाठी ही योजना म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याचा एक टप्पा आहे.
लाडकी बहीण योजना म्हणजे सणात दुहेरी आनंद त्यामुळे यावेळी मिळणार 3000 रुपयांची डबल भेट मिळण्याची शक्यता.