Rashmi Mane
UPI पेमेंटमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी लवकरच पिन ऐवजी फेशियल किंवा बायोमेट्रिक होण्याची शक्यता!
NPCI बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिफिकेशनद्वारे UPI पेमेंट सुरू करण्याच्या तयारीत आहे.
नवीन नियमांनुसार, PIN टाकणे ऐच्छिक होईल. यामुळे पेमेंट प्रक्रिया झपाट्याने होईल.
फिंगरप्रिंट, डोळ्यांची बायोमेट्रिक स्कॅन किंवा फेस रेकग्निशन वापरून UPI पेमेंट्स सहज होणार.
या प्रणालीमुळे व्यवहार अधिक जलद आणि सुरक्षित होतील, अडचणी कमी होतील.
फिंगरप्रिंट, डोळ्यांची बायोमेट्रिक स्कॅन किंवा फेस रेकग्निशन कॉपी करणे कठीण असल्यामुळे फ्रॉड कमी होण्याची शक्यता.
UPI पिन लक्षात ठेवण्याची गरज नाही. अशिक्षित किंवा वृद्धांसाठी मोठा दिलासा.
या नव्या तंत्रज्ञानामुळे भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्था अधिक सक्षम होणार!