Jagdish Patil
महायुती सरकारने नुकतंच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून ९२ लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.
अशातच आता महायुती सरकारने 'कॅप्टिव्ह मार्केट योजना' बंद करत आणखी एक धक्का दिला आहे.
या योजने अंतर्गत अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत दिली जात होती.
मात्र, या योजनेचा आर्थिक ताण येत असल्यामुळे वस्त्रोद्योग विभागाकडून ही योजना बंद करण्यात आली आहे.
त्यामुळे आता लाडक्या बहिणींना इथूनपुढे सरकारकडून साडी दिली जाणार नाही.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली होती.
यंत्रमाग क्षेत्राला चालना देणे आणि गरीब कुटुंबांना वस्त्र पुरवणे, असा या योजनेमागचा हेतू होता.
या योजने अंतर्गत २५ लाख अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबातील महिलांनी दिवाळीत साडी वितरीत केली जात होती.
या योजनेसाठी वार्षिक १०० कोटी रुपयांची तरतूद केली जात होती. २०२३ ते २०२५ असे सलग ३ वर्षे साड्यांचे वितरण केले.
मात्र, यंदाच्या दिवाळीत या साड्यांचे वितरण केले जाणार नसल्याचं वस्त्रोद्योग विभागाने स्पष्ट केलं आहे.