Rashmi Mane
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती आहे. सप्टेंबर महिन्याचे सुरुवातीचे दहा दिवस उलटून गेले असले तरीही ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही.
याशिवाय सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील अजून आलेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.
या योजनेतील हप्ता प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला जमा होत असतो. याआधी जर कधी हप्ता उशिरा मिळाला असेल, तर तो पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खात्यात जमा झाला आहे.
पण यावेळी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपूनही दोनही हप्त्यांची कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र जमा होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
योजनेच्या इतिहासावर नजर टाकली तर हप्त्यांमध्ये उशीर झाल्यानंतर अनेकदा दोन महिन्यांचे पैसे एकत्रित जमा करण्यात आले आहेत.
त्यामुळे यावेळीदेखील ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. जर तसा निर्णय झाला तर महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होतील.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता अनेकदा सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यामुळे यंदा नवरात्रीच्या काळात महिलांना हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे.
नवरात्रीत महिलांना आर्थिक मदत मिळाल्यास सणासुदीच्या तयारीसाठी त्याचा उपयोग करता येईल. तसेच, अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांना थोडा संयम बाळगावा लागणार आहे.