PM Kisan Yojana : PM किसान योजनेचा हप्ता आज खात्यात जमा होणार; पैसे आले की नाही असं करा चेक!

Rashmi Mane

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

आज देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

2000 रुपयांचा हप्ता

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2000 रुपयांचा हप्ता DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून देण्यात येईल.

PM Kisan 2025

हप्त्याची रक्कम

सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान हप्त्याची रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यासाठी लाभार्थ्याने ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

PM Kisan 2025

ई-केवायसी

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाच हप्त्याची रक्कम मिळेल. रक्कम जमा झाल्यावर संबंधित शेतकऱ्याला मोबाईलवर SMS द्वारे माहिती दिली जाईल.

PM Kisan Yojana | Sarkarnama

पैसा आला की नाही तपासण्यासाठी

शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. "Farmer Corner" मध्ये जाऊन "Beneficiary Status" वर क्लिक करून आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून आपला हप्त्याचा स्टेटस पाहता येईल.

PM Kisan Yojana | Sarkarnama

स्टेटस चेक करा

स्टेटसमध्ये जर e-KYC, Land Seeding आणि Aadhaar-Bank Seeding या तिन्ही ठिकाणी "Yes" असेल, तर हप्ता येण्याची शक्यता आहे.

PM Kisan 2025

ऑफलाइन पद्धतीने तपासा

जवळच्या बँकेत जाऊन बॅलन्स चेक करा किंवा पासबुक अपडेट करा.
बँकेतील व्यवहारातूनही माहिती मिळेल.

PM Dhandhanya Krishi Yojana | Sarkarnama

अधिक माहितीसाठी या ठिकाणी संपर्क करा

तक्रारीसाठी पीएम किसान हेल्पलाइन:
155261 / 011-24300606
वेबसाईट: pmkisan.gov.in

PM Kisan 2025

Next : बांगलादेशी मॉडेलकडे सापडलं आधार कार्ड! चौकशीत धक्कादायक माहिती उघड, कोण आहे ही मॉडेल? 

येथे क्लिक करा