Deepak Kulkarni
महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेकडे पाहिले जाते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झालेल्या योजनेबाबत रोज काहीतरी नवीन अपडेट समोर येत असते.
प्रत्येक लाभार्थी महिलेला दरवर्षी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर पुढचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही,असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये प्रति महिना देण्याचं आश्वासन दिलं होतं.
याचदरम्यान, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. भाऊबीजेला बहिणींच्या खात्यात योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे. लाभार्थ्यांना 1500 रूपयांऐवजी 2100 रुपयांचा सन्माननिधी जमा होण्याची शक्यता बळावली आहे.
मात्र, लाडक्या बहिणींना ही 2100 रुपयांची रक्कम महायुती सरकार नव्हे,तर मध्य प्रदेश सरकार देणार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मध्य प्रदेशात सुपर सक्सेस फुल ठरलेल्या ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात महायुतीनं आणली होती.
आता मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच मंत्री नरहर झिरवाळ यांनी या योजनेविषयी मोठे संकेत देताना गरज पडल्यास लाभार्थी महिलांच्या सन्मानिधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल, असं वक्तव्य केलं होतं.