Rashmi Mane
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत घोषणा केली होती.
अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असले तरी अजूनही काहींच्या खात्यात रक्कम गेलेली नाही.
उर्वरित महिलांच्या खात्यात दोन दिवसांत पैसे पोहोचतील, असेही सांगितले गेले. मात्र, लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
योजनेत जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते. त्यातील 26 लाख अर्जांची तपासणीदरम्यान बाद करण्यात आली. कारण अनेक महिलांनी नियमांच्या बाहेर जाऊन अर्ज केला होता. त्यामुळे या महिलांना हप्ता मिळणार नाही.
या योजनेचा लाभ फक्त 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांनाच मिळणार आहे. यापेक्षा जास्त वयाच्या महिलांना बाद करण्यात आले. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना ही मदत मिळणार नाही.
सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे, त्या कुटुंबातील महिलांना हप्ता मिळणार नाही. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
अधिकृत वेबसाइटवर जावे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सेक्शनवर क्लिक करून चेक पेमेंट स्टेट्स या पर्यायावर जावे. त्यानंतर आपला आधार क्रमांक व बेनिफिशियरी आयडी टाकल्यावर पेमेंटची माहिती दिसेल.