Rashmi Mane
म्हैसूरमधील ऐतिहासिक दसरा महोत्सव यंदा राजकारणाच्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
राज्य सरकारने प्रसिध्द लेखक बानू मुश्ताक यांना या महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
या निर्णयावरून काही लोक नाराज झाले आहेत आणि त्यांनी “एक मुस्लिम महिलेच्या हातून महोत्सवाचे उद्घाटन होऊ नये” अशी याचिका दाखल केली होती. परंतु, कर्नाटक उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
बानू मुश्ताक यांचा जन्म 1948 मध्ये कर्नाटकमधील हसन येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना कन्नड भाषेत साहित्याची आवड होती आणि शालेय जीवनातच त्यांनी लेखन सुरू केले.
विवाहानंतर त्यांना अनेक मानसिक आव्हाने आली, पण त्यांनी त्यातून बाहेर पडून आपली साहित्यिक वाटचाल सुरू ठेवली.
त्यांच्या Heart Lamp (हृदय दीप) या लघुकथा संकलनाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले, तसेच कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार आणि दाना चिंतामणी अत्तिमब्बे पुरस्कारही मिळाले.
मुश्ताक पत्रकार म्हणून लांकेश पत्रिकात काम केले आणि समाजातील अन्याय व महिलांच्या हक्कांबाबत आवाज उठवला. मुश्ताक या बंडाया आंदोलनात सक्रिय राहिल्या आणि मुस्लिम महिलांच्या मशिदींमध्ये प्रवेशासाठी त्यांनी लढा दिला आहे.
त्यांच्या साहित्यामध्ये समाजातील स्त्रियांची वेदना, संघर्षांचे चित्रण नेहमीच दिसते, त्यामुळे त्यांना दसरा महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी निवडणे हे केवळ सांस्कृतिक नव्हे तर सामाजिक प्रगतिशीलतेचेही प्रतीक आहे.