Mayur Ratnaparkhe
राम मंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनी भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
अयोध्येत राम मंदिर बांधणार हे नियतीने आधीच ठरवले होते. असं अडवाणींनी म्हटलं आहे.
सध्या फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कमी जाणवत असल्याचे अडवाणी म्हणाले.
राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनाने संपूर्ण जीवन बदलल्याची कबुलीही अडवाणींनी दिली आहे.
रामजन्मभूमी आंदोलनात अडवाणींसोबत नरेंद्र मोदींचाही सहभाग होता.
लालकृष्ण अडवाणींनी राम मंदिर सोहळ्याच्या निमित्त त्यांच्या पत्नी कमला अडवाणी यांचीही आठवण काढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा प्राणप्रतिष्ठापणा करतील, तेव्हा ते प्रत्येक भारतीयाचे प्रतिनिधीत्व करतील, असं अडवणांनी म्हटलं आहे.
'मला आशा आहे की हे मंदिर सर्व भारतीयांना श्री रामाचे गुण अंगीकारण्याची प्रेरणा देईल.' असं अडवाणींनी म्हटलं आहे.
श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण अडवाणींना देण्यात आले आहे.